सिल्लोड, (प्रतिनिधी) : धम्माचल फर्दापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुध्दिझम द्वारा आयोजित २० व्या अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेस माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट दिली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी परिषदेचे अध्यक्ष, उदघाटक व देश विदेशातून आलेल्या प्रमुख अतिथींचे स्वागत केले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर आमदार अब्दुल सत्तार व मान्यवरांनी धमाचल स्मरणीका व विविध विशेष अंकाचे प्रकाशन केले. आमदार अब्दुल सत्तार यांनी परिषदेला आलेले उपासक - उपसिका यांच्याशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या. अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेस आलेल्या उपासक उपासिकांसाठी आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने भोजन व्यवस्था करण्यात आली होती.















